loader image

पंचकर्म

श्री कमला आयुर्वेद रूग्णालयात, डॉ. महेश मुळे आणि डॉ. अंशु मुळे यांच्या तज्ञ मार्गदर्शनाखाली, आम्ही तुम्हाला पंचकर्माचे उपचार प्रदान करतो.

पंचकर्म म्हणजे काय?

पंचकर्म हा आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा गाभा आहे it’s core treatment of Ayurvedic treatment. Panchakarma detoxify body deeply upto cell level. पंचकर्माद्वारे शरीराची शुद्धी केल्यामुळे नंतर दिली जाणारी औषधे खूप लवकर आणि चांगली काम करतात. पंचकर्म ट्रीटमेंट योग्य व शास्त्रीय पद्धतीने केली गेली नाही तर त्याचे दुष्परिणाम सुद्धा शरीरावर होतात म्हणून आयुर्वेदातील तज्ञ डॉक्टर कडूनच पंचकर्मे करून घ्यावीत.
पंचकर्म या शब्दातच पाच कर्म सांगितले आहेत . यात वेगवेगळ्या मार्गाने शरीरातील दोष शरीराबाहेर काढून टाकले जातात. आयुर्वेदानुसार शरीरामध्ये वात, पित्त, कफ हे तीन दोष असतात. हे जेव्हा योग्य प्रमाणामध्ये असतात तेव्हा शरीराचे सर्व व्यापार व्यवस्थित चालतात पण यांचे प्रमाण कमी जास्त झाले की शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होत असतात .आपण रोज घेतलेल्या आहारामधून हे तीन दोष तयार होत असतात. ते पचनसंस्थेतील तीन वेगवेगळ्या अवयवांमध्ये तयार होत असतात ,जसे आमाशयात कफ, लघ्वंतरात पित्त, आणि पक्वाशयात वात तयार होतो. हे दोष प्रमाणापेक्षा जास्त तयार झाले असतील तर त्या त्या ठिकाणातून काढून टाकण्यासाठी पंचकर्म केले जाते .हे दोष बाहेर निघून गेले नाहीत तर ते संपूर्ण शरीरामध्ये पसरून वेगवेगळे आजार निर्माण करतात. पंचकर्म ही ताबडतोब रिझल्ट देणारी चिकित्सा आहे .दोष शरीराबाहेर निघून गेल्यामुळे शरीर दीर्घकाळ निरोगी राहण्यास मदत होते .
दुष्ट कफामुळे वेगवेगळे आजार होतात जसे दमा ,वारंवार होणारी सर्दी, थायरॉईडचे आजार, पीसीओडी, हृदयासंदर्भातील आजार ,काही मानसिक विकृती यामध्ये वमनाद्वारे म्हणजे उलटी द्वारे दोष बाहेर काढले जातात.
दुष्ट पित्तामुळे होणारे वेगवेगळे आजार जसे अर्धशिशी, आम्लपित्त, त्वचेचे वेगवेगळे आजार यात विरेचनाद्वारे म्हणजे जुलाबाच्या औषधाने शरीरातील दोष बाहेर काढले जातात .
वात खूप प्रमाणामध्ये वाढला असेल त्यामुळे सांधेदुखी ,वारंवार होणारे गर्भपात, गर्भधारणा न होणे, वंध्यत्व मुळव्याध ,दीर्घकालीन मलावष्टंभ अशा आजारांमध्ये बस्तीद्वारे म्हणजे संडासच्या जागेतून औषधे मोठ्या आतड्यामध्ये सोडली जातात.
मानेच्या वर असणाऱ्या अवयवांमध्ये असलेले दोष बाहेर काढून टाकण्यासाठी नस्य ही ट्रीटमेंट दिली जाते, ज्यामध्ये नाकाद्वारे औषधे सोडले जातात.
रक्तमोक्षन यामध्ये त्वचेच्या आश्रयाने रक्तामध्ये जे दोषअसतात ते बाहेर काढले जातात. यामध्ये सावकाश गतीने सुईच्या सहाय्याने, जलौका यांच्या मदतीने प्रत्यक्ष रक्त शरीराबाहेर काढले जाते

वमन

अनेक प्रकारचे त्वचारोग, दमा, सांधेदुखी, सूज, अम्लपित्त, इत्यादी आजारांवर वमन (उलटी) करवणे हिताचे असते. अन्नमार्गातला कफ, पित्त व दोष काढणे  हे वमनक्रियेचे उद्दिष्ट आहे . अशी स्वच्छता वेळोवेळी न केल्यास अन्नमार्गात कुजण्याची क्रिया होते. त्यातून निर्माण होणारे विषारी पदार्थ निरनिराळे आजार उत्पन्न करतात असे आयुर्वेदाचे सांगणे आहे.

“वमन “ ही शरिरातील विकृत कफ स्वरुपात वाढलेल्या विषारांना  शास्त्रशुद्ध पद्धतीने उलटीवाटे बाहेर काढुन टाकले जाते. यामध्ये सोरीयासिस, दमा ,विविध त्वचाविकार,अम्लपित्त, मधुमेह, पाळीच्या तक्रारी ,आमवात (सांध्यांना सुज येणे), सांधे वाकडे होणे.

किडनीचे विकार (मुत्रपिंडाला सुज येणे) शीतपित्त( अंगावर पित्ताच्या गांधी उठणे),अमर्याद वजन वाढणे ,स्त्रियांमधील वंध्यत्व, मानेच्या वरच्या भागातील विविध आजार ,नाकाचे हाड वाढणे ,सतत सर्दी ,शिंका येणे, यासारख्या अनेक आजारांचे विकृत कफ हे कारण असल्याने “वमन” या पंचकर्माद्वारे शरिराचे शुद्धिकरण करुन नंतर औषधोपचार केल्यास आजार कायम स्वरुपी बरा होऊ शकतो. तसेच आजार होऊच नयेत म्हणुनही वसंत ॠतुमध्ये म्हणजेच थंडी संपल्यावर चैत्राच्या आसपास ( मार्च /एप्रिल या महीन्यात) आपापल्या प्रकृतिला अनुसरून वर्षातून  एकदा “ वमन “ करुन घेतल्यास पुढे होणारे अनेक आजार टाळता येऊ शकतात.

विरेचन

“विरेचन”. यामध्ये विकृत पित्त व इतर दोष शास्त्रशुद्ध पद्धतीने जुलाबावाटे बाहेर काढुन टाकले जातात. विविध प्रकारचे ऊष्णतेचे विकार , ह्रदयाचे विकार, पॅरॅलिसिस , त्वचेचे विकार, पोटाचे विकार , अजीर्ण ,मलावष्टंभ ( पोट साफ न होणे) ,पोट दुखी, विविध प्रकारच्या गाठी , डोळ्यांचे विविध आजार , आतड्यांना सुज ,काविळ , पचन संस्थेचे विविध विकार , संपुर्ण शरीरावर सुज , नाकातून घशातून रक्त पडणे , श्वसनाचे विकार , बी.पी. वाढणे , मानसिक आजार , वारंवार डोके दुखणे , पित्ताशयात खडे होणे , यकृताचे विविध आजार  यांसारख्या अनेक आजारांवर “विरेचन” हे पंचकर्म उपयोगी पडते. याशिवाय हे आजार होऊच नयेत म्हणुनही प्रामुख्याने शरदॠतुमध्ये व ऑक्टोबरमध्ये ही  विरेचन प्रक्रीया केली जाते.

अनेक रुग्ण किंवा स्वस्थ व्यक्ती दरवर्षी नित्यनियमाने हे विरेचन कर्म करवुन घेतात कारण त्यांनी याचे फायदे मागील वर्षी अनुभवलेले असतात.

बस्ती

बस्ती म्हणजे सिद्ध केलेले तेल किंवा काढा गुदद्वारातून मोठया आतडयात सोडणे. “बस्ति”. हे पंचकर्म प्रामुख्याने “विकृत वात” यासाठी केले जाते. आयुर्वेदामध्ये “बस्ति”हे कर्म सर्व प्रकारच्या आजारांची “अर्धी चिकित्सा”म्हणून सांगितलेली आहे. “वात”या शरिरातील घटकाला आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. शरिरातील कोणत्याही घडामोडी या वाताशिवाय होऊच शकत नाहीत असे सुत्र सांगते. त्यामुळे आजार कोणताही असू  दे तो होण्यामागे बिघडलेला वात हे कारण प्रामुख्याने असू शकते. अश्या सर्व प्रकारच्या वाताच्या विकारांमध्ये ,सांध्याचे विकार, मणक्यांचे विकार , Ankolysing spondilytis ,Lumber spondylosis ,cervical spondylosis, 

Muscular Spasm , गर्भाशयजन्य दोष, स्त्रीयांमधील रजोदोष, मलावष्टंभ , आतड्यांचे विविध विकार , इ. अनेक विकारांवर विविध औषधांच्या काढ्यांचा , औषधी सिद्ध दुधाचा ,औषधी तेलांचा ,तुपांचा बस्ति हा ऊदद्वारामार्गे शरिरात सोडला जातो .ज्यामुळे पक्वाशयामध्ये हि औषधे जाऊन रक्तवाहिन्यांमार्फत शोषली जाऊन  वरील विकारांवरअपेक्षित कार्य घडवून आणले जाते. हे बस्ति कर्म प्रामुख्याने स्वस्थ व्यक्तीकरिता पावसाळ्यामध्ये केले जाते.

नस्य

नस्य म्हणजे नाकात औषधी थेंब किंवा चूर्ण टाकणे. “नस्य” नाकाद्वारे औषधी तेले,तुपे, दुध ,चुर्ण शरिरामध्ये सोडुन आजारांना कारणीभूत अशा दोषांना शरिराबाहेर काढुन टाकणे किंवा त्या दोषांचे शमन करणे या प्रक्रियेला नस्य म्हणतात. ”नासा हि शिरसो द्वारम्…!!” असे आयुर्वेदामध्ये एक सुत्र आहे. शिरोस्थानामध्ये पोहोचण्याचा मार्ग नाकामधून जातो. त्यामुळे मेंदुचे विविध विकार, चेह-याचे त्वचेचे विकार, जुनाट सर्दी ,नाकाचे हाड वाढणे , नाकामध्ये मांसांकुर निर्माण होणे,मानसिक विकार , फिट्स येणे, स्त्रियांमधील Hormonal Imbalance , Facial Paralysis, कानाचे जीर्ण विकार ,डोळ्यांचे विविध आजार यासारख्या अनेक तक्रारीसाठी नस्य हे पंचकर्म केले जाते.

रक्तमोक्षण

“रक्तमोक्षण”. याचा अर्थ शरिरातील अशुद्ध रक्ताचे निर्हरण करणे. विविध कारणांनी रक्तामधील दोष वाढले असता सोरीयासिस, त्वचेचे विकार, सुज येणे , सांधे सुजणे, लाल होणे ,दुखणे ,गाठी तयार होणे , फोड येणे ते पिकणे, गळु किंवा बेंड उठणे ,पित्ताच्या गांधी उठणे , केसांमध्ये चाई पडणे ( केस जाणे) , त्वचेवर डाग पडणे ,पायाचे अंगठे सुजणे , Gout , Vericose veins , यांसारखे आजार निर्माण होतात

आशा वेळी औषधी उपचारांबरोबरच “रक्तमोक्षणाद्वारे” अशूद्ध रक्त शरिराबाहेर काढुन टाकले असता आजार पूर्ण व लवकर बरी होण्यास मदत होते. प्रायः शरद ॠतूमध्ये विधिपुर्वक सार्वदेहीक रक्तमोक्षण केल्यास शरीर स्वस्थ राहुन सर्व येणा-या रोगांपासुन शरीर संरक्षित ठेवता येते.

या पंचकर्म उपचारांचे महत्व ओळखून तसेच “जागतिक आरोग्य संघटनेने “ या पंचकर्म उपचारांना मान्यता देऊन त्याचा प्रचार व प्रसार केल्याने खास Medical Tourism च्या नावाखाली भारतात येऊन विविध आयुर्वेदिक क्लिनिक्स वा हॉस्पिटल्स मध्ये उपचार घेऊन स्वस्थ होऊन जातात. आपण भारतीय मात्र आयुर्वेद म्हणजे असंशोधनात्मक आहे किंवा उशिरा गूण येतो या भ्रमापायी आपल्या या जगन्मान्य शास्त्राकडे कानाडोळा करतो व पर्यायाने स्वतःचेच नुकसान करुन घेतो आहोत.

इथे सुरु होते परिपूर्ण आरोग्याची...मातृत्वाची... वात्सल्याची कहाणी

Contact Detail

Reach out for authentic Ayurvedic treatments. Contact us to experience holistic wellness through ancient wisdom and personalized care.

YouTube Channel

Subscribe our channel to know more about panchakarma & ayurvedic treatments.

Panchakarma Treatments
0 +
Years’ Experience
0 +
Patients
0 +

Facilities

Panchakarma

Online Consultation

Counseling