उत्तर बस्ती
उत्तर मार्गाद्वारे म्हणजे पुरुषांमध्ये मूत्रमार्गातून मूत्राशयामध्ये व स्त्रियांमध्ये योनी मार्गातून गर्भाशयामध्ये जो बस्ती दिला जातो त्याला उत्तर बस्ती असे म्हणतात. उत्तरबस्ती या शब्दाचा दुसरा अर्थ म्हणजे जी बस्ती श्रेष्ठ गुणांनी युक्त आहे, ज्या बस्तीचे व्यापक सकारात्मक परिणाम त्वरित दिसून येतात तिला उत्तर बस्ती असे म्हणतात.
पंचकर्म हा आयुर्वेद चिकित्सेचा गाभा आहे यातीलच एक उत्तर बस्ती ही महत्त्वाची ट्रीटमेंट आहे. उत्तर बस्ती चे उपचार आयुर्वेदातील तज्ञ डॉक्टरांकडून संपूर्ण शास्त्रीय पद्धतीने करून घेतल्यास याचे अतिशय त्वरित, व्यापक व सकारात्मक परिणाम रुग्णांना मिळालेले दिसून येते. संपूर्ण निर्जंतुकीकरण प्रक्रिया काटेकोरपणे अवलंबून शस्त्रक्रिया गृहात (In minor OT, under all aseptic precautions Uttarbasti procedure is done) स्त्री व पुरुष उत्तर बस्ती ट्रीटमेंट केल्या जातात. त्यामुळे कुठल्याही पद्धतीचे इन्फेक्शन होण्याची शक्यता नसते.
स्त्रियांमध्ये मासिक पाळी येऊन गेल्यानंतर, ब्लीडिंग संपूर्ण थांबल्यानंतर सलग पाच दिवस या बस्ती केल्या जातात. काही अवघड केसेस मध्ये या पद्धतीचे तीन सेट्स सलग तीन महिन्यांच्या मासिक पाळी नंतर केले जातात. उत्तर बस्ती करण्या अगोदर प्रत्येक स्त्रीला निरुह व मात्रा बस्ती अशा पद्धतीचे योग बस्ती चे उपचार प्रथमतः नक्की केले जातात. त्यामुळे उत्तरबस्ती चे कुठलेही दुष्परिणाम होत नाहीत व त्या पेशंटला त्याच्या समस्येवर उत्तम परिणाम झालेले दिसून येतात
स्त्रियांमध्ये:
●Primary & secondary Infertility,
●Multiple abortions,
●PCOS,
●Endometriosis,
●Adenomyosis,
●Endometrial Tuberculosis,
●Congenital disorders (विकृत गर्भ निर्माण होणे),
●Fallopian tubes blockages,
●Multiple adhesions in Uterus & Pelvis,
●Pelvic Inflammatory diseases (PID),
●Acidic cervical pH,
●Uterine fibroids,
●Recurrent Leucorrhea,
●Vaginitis,
●Recurrent Menorrhagia
●Bicornuate & Unicornuate Uterus.
● गर्भाशयात पडदा असणे( Septum in Uterus)
● गर्भाशयाचा अंतस्तर अतिशय पातळ असणे( Endometrim Insufficiency, Very Thin Endometrium) यामुळे गर्भधारणा राहण्यास अडथळा निर्माण होतो.
यासारख्या अनेक समस्यांवर उत्तरबस्तीच्या उपचाराने उत्तम परिणाम मिळतात.
याचप्रमाणे पुरुषांमध्ये देखील वंध्यत्वाच्या कारणांमधील-
●शुक्राणूंची संख्या खूप कमी असणे (Oligozoospermia) अथवा अजिबात नसणे (Azoospermia)
●शुक्राणूंमध्ये रचनात्मक दोष असणे (Morphological defects, Teratozoospermia)
●मृत शुक्राणू निर्माण होणे (Nacrospermia)
●शुक्राणूंची हालचाल खूप कमी असणे (Asthenozoospermia)
●शुक्राणूंमध्ये पुयनिर्मिती होणे(Pus cells in semen)
●Acidic PH of Semen,
●Very viscous Semen etc.
●Prostate Enlargement (Benign Prostatic Hyperplasia or पौरुष ग्रंथी खूप मोठी होणे)
●Urethral Stricture (मूत्रवाहक नलिकेमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे लघवी अडखळत व थेंबथेंब व वेदनादायी होणे)
●वारंवार मूत्रमार्गाचे इन्फेक्शन होणे (Recurrent UTI)
●शरीरसंबंधाचे वेळी लिंगात कडकपणा न येणे(Erectile Dysfunction) व
●शीघ्र वीर्यपतन(Premature Ejaculation)
●लहान वयातच व तरुणपणी देखील अनेकवेळा केलेल्या हस्तमैथुनाचे (Severe side effects of heavy Masturbation)
दुष्परिणाम घालविण्यासाठी पुरुष उत्तरबस्ती चे उपचार अतिशय प्रभावी ठरतात. पुरुषांमध्ये देखील उत्तर बस्ती करण्याअगोदर निरुह व मात्राबस्ती या उपक्रमाने प्रथमतः योग बस्ती करून घेतले जातात. त्यामुळे उत्तर बस्तीचे कुठलेही दुष्परिणाम होत नाहीत.
Change language to read this information in other languages
इथे सुरु होते परिपूर्ण आरोग्याची...मातृत्वाची... वात्सल्याची कहाणी
Contact Detail
Reach out for authentic Ayurvedic treatments. Contact us to experience holistic wellness through ancient wisdom and personalized care.
- Shree Kamala Ayurved Hospital, Lendkar Mala, Balikashram Road, Ahmednagar 414003.
- +91 9309039395
- [email protected]