अग्निकर्म चिकित्सा
अग्निकर्म ही चिकित्सा मुख्यतः वेदनाशमन करण्यासाठी वापरली जाते. आदरणीय डॉक्टर रा.ब. गोगटे यांनी सुश्रुत, वागभट व चरक संहितेत सांगितलेली ही अग्नीकर्मचिकित्सा व्यवहारामध्ये अनेक रुग्णांवर अतिशय यशस्वीपणे खूप मोठ्या प्रमाणात वापरली व तिचा प्रचार केला. याबाबतीत त्यांनी अनेक डॉक्टरांना प्रशिक्षितही केले. सोने ,लोखंड, तांबे, पंचधातू, माती अशा वेगवेगळ्या शलाका यासाठी वापरल्या जातात. या शलाकांनी निश्चित ठिकाणी शेक दिला जातो.
त्या उष्णतेमुळे रक्तवाहिन्यां विस्तारित होतात, त्यामुळे स्थानीन रक्ताभिसरण वाढते त्यामुळे त्या जागी साठलेले दोष तेथून निघून जाऊन रक्त शुद्धीकरण यंत्रणेमध्ये जातात आणि वेदना कमी होते. स्नायू संधी आणि हाडांच्या ठिकाणी असणाऱ्या वेदना खूप तीव्र असतात आणि दीर्घकाळ त्या ठिकाणी असतात( Pains due to Knee Osteoarthritis, Cervical & Lumbar Spondylosis, spondylitis, Ankylosing spondylitis, Gout, , Rhumatoid Arthritis आमवात, Ligamental injuries, Sports i juries, Sprain, Calcanium spur etc.)
काही वेळा जेव्हा वेदना खूप तीव्र असतात तेव्हा औषधे, पंचकर्म याच्याबरोबर अग्नी कर्म केले जाते. तर मंद वेदना खूप दीर्घकाळ असतील तेथे केवळ अग्निकर्माने पण वेदना कमी होतात.
टाच दुखणे, चामखीळ, शरीरावर येणाऱ्या गाठी, मुळव्याध ,सांधे दुखणे, मान ,पाठ ,कंबर दुखणे, फ्रोजन शोल्डर( Frozen Shoulder) सायटिका, कुरूप Corn, कावीळ Jaundice अशा आजारांमध्ये वेगवेगळ्या अग्नीकर्म शालाका वापरून अग्नी कर्म केले जाते. अग्निकर्म उपचाराने मोठ्या पद्धतीचे कॉर्न Corn कुरूप देखील खूप उत्तम प्रकारे काढले जाते व या पद्धतीने कॉर्न काढल्यानंतर हे Corn पुन्हा पुन्हा निर्माण देखील होत नाही. स्त्रियांना मासिक पाळीत होणाऱ्या पोट व कंबर दुखीवर ( Dysmenorrhea) देखील अग्निकर्माने उत्तम उपयोग होतो .शरीरावर अनेक ठिकाणी येणाऱ्या चरबीच्या गाठी Lipomas अग्नीकर्माने घालविता येतात. हाडांचे फ्रॅक्चर्स ऑपरेशन नंतर जुळून आल्यानंतर देखील स्नायूंमध्ये जो कडकपणा आलेला असतो त्यामुळे रुग्णांच्या हालचाली पूर्वीसारख्याच सुरळीत होत नाहीत त्या सुरळीत होण्यासाठी व तेथील वेदना कमी होण्यासाठी अग्निकर्माचा उत्तम उपयोग होतो.
Change language to read this information in other languages
इथे सुरु होते परिपूर्ण आरोग्याची...मातृत्वाची... वात्सल्याची कहाणी
Contact Detail
Reach out for authentic Ayurvedic treatments. Contact us to experience holistic wellness through ancient wisdom and personalized care.
- Shree Kamala Ayurved Hospital, Lendkar Mala, Balikashram Road, Ahmednagar 414003.
- +91 9309039395
- [email protected]