loader image

Achievements & Social Work

Dr. Mahesh Mulay and Dr. Anshu Mulay have achieved remarkable milestones in their respective careers, garnering accolades and recognition from both national and international platforms.

परिचय

डॉ. सौ. अंशु महेश मुळे व डॉ. महेश विष्णुपंत मुळे

  • १९९८ वर्षांपासून “श्री कमला आयुर्वेद हॉस्पिटल” येथे आयुर्वेदिक वंध्यत्व उपचार तज्ञ व जीर्णव्याधी उपचार तज्ञ (Speciality in Infertility & Chronic disorders) म्हणून कार्यरत
  • अनेक राष्ट्रीय परीषदांमध्ये व्याख्याने.
  • अनेक वृत्तपत्रांमध्ये, मासिकांमध्ये आरोग्य विषयक समाजप्रबोधनात्मक लेखन, आरोग्य विषयक विविध ठिकाणी व्याख्याने, अहमदनगर आकाशवाणी केंद्रावर हॅलो डॉक्टर, आपले स्वास्थ्य, ध्येयपूर्ती या कार्यक्रमात आरोग्यविषयक व सामाजिक विषयावर मार्गदर्शन.
  • तारुण्यावस्थेकडे जाणाऱ्या किशोरवयीन मुलांना त्यांच्यात होणाऱ्या शारिरीक व मानसिक बदलांचे शास्त्रीय ज्ञान देऊन योग्य मार्गदर्शन करण्यासाठी ‘वयात येताना’ या कार्यक्रमाअंतर्गत विविध शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये विनामूल्य मार्गदर्शन.
  • गुहा ता. राहुरी येथील गंगाधरबाबा छात्रालय या ७० अनाथ मुलांच्या आश्रमासाठी कार्यरत. यात मुलांचे राहण्याचे घर, स्वयंपाकघर, शौचालये या वास्तुंची स्वखर्चाने उभारणी, मुलांसाठी विविध तज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने, कार्यशाळा, शिबिरे यांचे आयोजन. सर्वार्थाने मुलांच्या निकोप शारिरीक व मानसिक विकासासाठी सतत प्रयत्नशील.
  • अहमदनगर येथील स्नेहालय, स्नेहांकूर दत्तक विधान केंद्र, बालभवन या संस्थांसाठी आर्थिक व आरोग्यविषयक मदत. यांच्यासाठी कायमस्वरूपी विनामूल्य सर्व आरोग्य सेवा, समाजातील सर्वांसाठी विनामूल्य विवाहपूर्व समूपदेशन. Borderless world foundation या संस्थेमार्फत काश्मीरी अनाथ मुलींसाठी भरीव स्वरुपात मदत कार्य करतात.
  • Plus Foundation या त्यांच्या बारा कुटुंबांनी एकत्र येवून स्थापन केलेल्या NGO मार्फत नगरमध्ये दर महिन्याला विविध विषयांवर व्याख्याने व कार्यशाळांचे आयोजन केले जाते. या NGO च्या माध्यमातून आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, अंदमान निकोबार येथील शाळांमध्ये विविध कार्यशाळांचे व ज्ञानवर्धनार्थ विविध व्याख्यानांचे आयोजन केले जाते.
  • कोरोना महामारीच्या काळात ३००० कोरोना बाधीत रुणांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचार, कोरोनाच्या अनेक Serious व Critical रुग्णांवर आयसीयूमध्ये यशस्वी आयुर्वेदिक उपचार केले.
  • कोरोनाच्या लॉकडाऊन च्या काळात लालटाकी सेवा संघामार्फत अहमदनगर शहर परिसरातील दीड लाख गरजू नागरिकांना ग्रम व ताजा अन्नाच्या पाकिटांचे वाटप. ६०० गरजू कुटुंबांना १५ दिवस पुरेल एवढया किराणा सामान कीटचे वाटप केले.
  • मिशन राहत या उपक्रमा अंतर्गत कोरोना महामारी च्या काळात ४०००० स्थलांतरित व विस्थापित कामगारांना आरोग्यसेवा व अन्नदान सेवा पुरविली.

मिळालेले पुरस्कार

  • त्यांच्या या कार्याची दखल घेवून मुंबईच्या आशा फाऊंडेशन ने समाज शिक्षणासाठी दिल्या जाणाऱ्या ” शिक्षकेतर शिक्षक ” या पुरस्काराने त्यांना गौरविले आहे.
  • अहमदनगरच्या सरगमप्रेमी मित्रमंडळाने सामाजिक कार्यासाठी त्यांना “जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान केला आहे.
  • किशोरवयीन मुलांसाठी घेत असलेल्या “वयात येतांना” या प्रबोधनात्मक कार्यासाठी सकाळ सोशल फाऊंडेशन व रेडीओसिटी यांनी त्यांना “सिटीचे हिरो’ या पुरस्काराने गौरविले आहे.
  • युवक युवतींसाठी अनेक वर्षांपासुन, भरीव स्वरुपात करत असलेल्या विविध प्रबोधनात्मक उपक्रमांसाठी पुणे येथील नानल फाऊंडेशन ने त्यांना “विद्यार्थी – शिल्पकार” हा पुरस्कार प्रदान केला आहे.

सुषमा स्वराज कर्तुत्ववान महिला पुरस्कार:

वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात सातत्याने करत असलेल्या उल्लेखनीय व समाजाभिमुख कार्याबद्दल डॉ. अंशू मुळे यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सुषमा स्वराज कर्तुत्ववान महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

Dr Anshu Mulay Achievement Award

जीवनगौरव पुरस्कार:

वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात सातत्याने केलेल्या समाजाभिमुख, अभिनव, समाजातील सर्व घटकांना व तळागाळातील सर्वांना लाभदायी होईल अशा उल्लेखनीय कार्याबद्दल अहमदनगर येथील सरगमप्रेमी मित्र मंडळाने डॉ.सौ. अंशू मुळे व डॉ. महेश विष्णुपंत मुळे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे

आयुर्वेद मित्र 2019:

गेल्या पंधरा वर्षापासून डॉ. महेश मुळे व डॉ. सौ अंशू मुळे मुला-मुलींसाठी वयात येताना व कळी उमलताना( किशोरवयीन अवस्था विकास और समस्या) या प्रबोधनात्मक, मार्गदर्शनपर व्याख्यानांद्वारे पौगंड अवस्थेमध्ये Adolescent age group मुला-मुलींमध्ये Hormones मुळे होणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलांविषयी शास्त्रीय माहिती देऊन या बदलांना सकारात्मक पद्धतीने सामोरे कसे जावयाचे याविषयी मार्गदर्शन करत आहेत. अनेक शाळांमध्ये हजारो विद्यार्थ्यांना इंग्रजी, हिंदी व मराठी भाषांमधून या दोघांनी ही व्याख्याने दिलेली आहेत. 

या व्याख्यानांचे अतिशय सकारात्मक परिणाम दिसून आल्याचे शाळांच्या व्यवस्थापनाने सांगितले आहे. या व्याख्यानांची उपयुक्तता लक्षात घेऊन अहमदनगर जिल्हा परिषदेने अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शाळांना ही व्याख्याने आयोजित करण्याचे बंधनकारक केलेले आहे. त्यांच्या कामाची प्रशासनाने घेतलेली ही उत्तम दखल आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल पुणे येथील नाणल फाउंडेशनने या उभयतांना आयुर्वेद मित्र 2019 या पुरस्काराने सन्मानित केले आहे.

समाजातील तरुण-तरुणींसाठी योग्य करिअर कसे निवडावे? आयुष्याचा जोडीदार कसा निवडावा? या संदर्भात विनामूल्य समुपदेशन, सामाजिक बांधिलकी कशी जोपासावी? स्वतःचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम कसे ठेवावे? व्यसने कशी टाळावीत ?आयुर्वेद जीवनशैली म्हणून स्वीकारल्याचे कसे फायदे होतात? अशा विविध व्याख्यानांच्या माध्यमातून व अनेक श्रम व संस्कार शिबिरांच्या आयोजनांच्या माध्यमातून सातत्याने करत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सकाळ सोशल फाउंडेशन व रेडिओ सिटी यांनी डॉ अंशू मुळे व डॉ महेश मुळे यांना *सिटीचे हिरो या पुरस्काराने सन्मानित केले आहे

Achievements of Dr. Mahesh Mulay & Dr. Anshu Mulay along with their social work towards needy people in ahmednagar.
WhatsApp Image 2023-10-27 at 08.51.43_9ef0d342
WhatsApp Image 2023-10-27 at 08.51.44_a057b657
WhatsApp Image 2023-10-27 at 08.53.59_d696b555
WhatsApp Image 2023-10-27 at 08.54.59_ab4d802f

वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रयोगांच्या माध्यमातून समाजासाठी हितकारक ठरणाऱ्या कार्याबद्दल सकाळ सोशल फाउंडेशनने या उभयतांना आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र Idols of Maharashtra या महत्त्वपूर्ण पुरस्काराने सन्मानित केले आहे

Shri Kamala Ayurved Hospital - Achievements (7)
WhatsApp Image 2023-10-27 at 09.04.58_45fbe1ba
WhatsApp Image 2023-10-27 at 09.07.33_c366fa8f
Dr Anshu Mulay Achievement Award (4)

Dr. Mrs. Anshu Mahesh Mulay delivered expert lectures at the below-mentioned conference.

Agnividdha Conference 2023:

Agnividdha Conference 2023 organised by Varkari Ayurved at Pune.

  • Topic- Role of Agnikarma & Viddhakarma in Spinal disorders & Multiple Arthritis

Ayurved Vyaspith:

National Conference on Panchbhautik Chikista organised by Ayurved Vyaspith at Ahmednagar.

  • Topic- Successful treatment of Female Infertility

NIMA & Arogyabharati

National conference on Strirog, organised by NIMA

  • Topic- Treatment of PCOD & Fallopian Tubal blockage with Uttarbasti

National Conclave on Insta pain management, organised by Arogyabharati at Thane Mumbai

  • Topic- Effective use of Agnikarma & Viddhakarma in Severe Dysmenorrhea & Ovarian cysts.

Dr. Mahesh Mulay delivered expert lectures at the below-mentioned conference.

International conference on Male Infertility:

International conference on Male Infertility held at Delhi, organised by All India Institute of Ayurveda(AIIA, NEW DELHI)

  • Topic- Role of Uttarbasti & Viddhakarma in Male Infertility.

International Ayurveda Research Conference 2023:

International Ayurveda Research Conference organised by International Ayurved Association held at Pune.

  • Topic- Successful Management of Male & Female Infertility by Ayurveda

Ayurved Parva International Conference on Ayurveda 2022:

Ayurved Parva International Conference on Ayurveda, organised by Ayurved Vyaspith held at Nagpur.

  • Topic- Management of Critical Male & Female Infertility cases & Genetic Disorders with Testimonials of patients.

National Conference on Panchbhautik Chikista 2016:

National Conference on Panchbhautik Chikista, organised by Ayurved Vyaspith held at Ahmednagar.

  • Topic- Treatment of Male Infertility with Panchbhautik Chikista.

AUGUSTCON 2019. International Ayurveda conference:

AUGUSTCON 2019. International Ayurveda conference organised by Nanal Ayurved Research Foundation held at Pune.

  • Topic- Treatment of Male & Female Infertility with Panchkarma & Uttarbasti.

Workshop on Male Infertility:

Workshop on Male Infertility organised by Ayurved Vyaspith Mumbai.

  • Topic- Understanding the concept of Shukradhatu, Veerya& Oja.

National conference on Male Infertility 2016:

National conference on Male Infertility, organised by Ayurved Vyaspith held at Nagpur.

  • Topic- Semen examination based on Ayurvedic concepts & corelation with modern parameters.

Social Work

Beyond their professional achievements, Dr. Mahesh Mulay and Dr. Anshu Mulay are driven by a profound sense of social responsibility. They firmly believe in giving back to the community and have initiated numerous projects to provide healthcare and wellness services to underprivileged individuals. Their commitment to making Ayurvedic treatments accessible to all segments of society has touched countless lives.

COVID & Ayurveda

Dr. Mahesh Mulay & Dr. Anshu Mulay were the only ones in the Maharashtra State to be authorized officially by the government to provide Ayurvedic treatments during the pandemic of COVID 19 in the district of Ahmednagar. Their efforts and meticulous research helped lakhs of patients of COVID, who were treated successfully with ayurvedic treatments. This made the government to take note of importance of Ayurveda in the treatment of newer diseases.

कोरोना महामारीच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये डॉ. सौ. अंशु मुळे, डॉ. महेश मुळे व युगंधर महेश मुळे यांनी सामाजिक जाणीवेच्या भावनेतून वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य

● अहमदनगर जिल्ह्यातील सरकार मान्य पहिले कोविड रुग्णालय बूथ हॉस्पिटल येथे 6800 कोरोना बाधित रुग्णांवर यशस्वी आयुर्वेदिक उपचार केले. औषधांबरोबरच रुग्णांचे मनोबल उत्तम राहावे यासाठी त्यांनी वेळोवेळी रुग्णांचे समुपदेशन केले. त्याच वेळी त्यांचा आहार उत्तम असावा या दृष्टीने त्यांनी समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहाय्याने रुग्णांना त्या ठिकाणी आरोग्यपूर्ण आहार मोफत दिला. या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून या हॉस्पिटलमध्ये रुग्ण उत्तम प्रकारे बरे होण्याचे प्रमाण खूप उल्लेखनीय होते.
● नगर शहर व जिल्ह्यातील अनेक कोविड सेंटर व अनेक नामवंत हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉ. सौ. अंशु मुळे व डॉ. महेश मुळे यांनी आयसीयू मध्ये कोरोना बाधित अतिशय गंभीर अवस्थेतील रुग्णांवर आयुर्वेदिक उपचार केले. आयुर्वेदशास्त्र इमर्जन्सी मध्ये देखील व गंभीर अवस्थेमध्ये देखील किती लाभदायी ठरते याचा प्रत्यय या निमित्याने रुग्णांना व नातेवाईकांना
आला .उत्तम दर्जाची व अनुभवी आयुर्वेद तज्ञांकडून घेतलेली आयुर्वेदाची योग्य व शास्त्रीय उपचार पद्धती गंभीर अवस्थेमध्ये देखील किती लाभदायी होते या निमित्याने नागरिकांना समजून आले.
● या काळात नागरिकांना कोरोना होऊ नये म्हणून अहमदनगर शहरातील व जिल्ह्यातील अनेक प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये Containment Zone जाऊन त्यांनी गुडूची घनवटी, आयुष काढा व अणूतेल या करोना प्रतिबंधात्मक आयुर्वेदिक औषधांचे मोफत वाटप केले व नागरिकांचे मनोबल उत्तम राहावे यासाठी त्यांचे सकारात्मक प्रबोधन केले. नंतर झालेल्या survey मधून या औषधांचा लाखो नागरिकांना खूप सकारात्मक फायदा झाल्याचे दिसून आले.
● कोरोना महामारीच्या काळात सर्व कामे थांबल्याने अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती. अशावेळी श्री कमला आयुर्वेद हॉस्पिटलच्या वतीने 600 गरीब कुटुंबांना पंधरा दिवस पुरेल एवढ्या किराण्याचे वाटप करण्यात आले.
● या कठीण काळामध्ये कित्येक जणांना एक वेळचे अन्न मिळणे देखील मुश्किल झाले होते. अशावेळी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून डॉ. सौ. अंशु मुळे, युगंधर मुळे व डॉ. महेश मुळे यांनी लालटाकी सेवा संघ या संस्थेच्या माध्यमातून अहमदनगर शहर परिसरातील 50 हजार लोकांना रोज ताजे व गरम भाजीपोळी, पुलाव, पुरीभाजी अशा पद्धतीचे ताज्या अन्नाचे वाटप या संस्थेच्या सदस्यांच्या मदतीने घरोघरी जाऊन केले.
या काळात आपल्याला कोरोना होईल या भीतीने कोणीही एकमेकांकडे जाण्याचे टाळत होते अशा कठीण परिस्थितीमध्ये मुळे कुटुंबीयांनी स्वतःच्या जीवावर उदार होऊन, लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांना कोरोना प्रतिबंधात्मक आयुर्वेदिक औषधे, ताजे अन्न, किराणा व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
● या काळात वैद्यकीय उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टरांसहित इतर नर्स, वॉर्ड बॉय व हॉस्पिटल मधील इतर कर्मचारी यांचे जीवन देखील धोक्यात आलेले होते. अशावेळी त्यांना कोरोना होऊ नये म्हणून या परिवाराचे वतीने कोरोना प्रतिबंधात्मक आयुर्वेदिक औषधांचे वाटप मोफत करण्यात आले.
●या महामारीच्या काळात मृत्यूचे प्रमाण प्रचंड होते. त्यामुळे या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची मोठी जबाबदारी स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांवर आली होती. इतका मोठा ताण या यंत्रणेवर आल्यामुळे येथील कर्मचारी देखील कोरोना बाधित होऊ लागले होते व त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना धोका निर्माण झाला होता .याची गांभीर्याने दखल घेऊन डॉक्टर मुळे कुटुंबीयांच्या वतीने स्मशानभूमीतील सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक आयुर्वेदिक औषधांचे मोफत वाटप करण्यात आले व त्याचे अतिशय सकारात्मक परिणाम दिसून आले.
● कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये सर्वच बाबतीत अज्ञान असल्यामुळे अनेक लोक प्रचंड घाबरून गेले होते अशावेळी परप्रांतातील कामगारांनी आपल्या मूळ गावाकडे परत जाण्याचा मार्ग निवडला होता परंतु त्या काळात कुठलेही वाहने त्यांच्यासाठी उपलब्ध नव्हते. अशावेळी हे कामगार आपल्या लहान मुला बाळांसहित पायी चालत आपल्या मूळ गावाकडे जात होते. त्यावेळी त्यांच्या अन्न पाण्याचा व आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. अशावेळी अहमदनगर येथील स्नेहालय व इतर सामाजिक संस्थांच्या वतीने मिशन राहत हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत या कामगारांना अन्न, पाणी, औषधे, जीवनावश्यक वस्तू ,कपडे यांचे मोफत वाटप करण्यात आले. 25 दिवस चाललेल्या या संपूर्ण उपक्रमामध्ये डॉक्टर मुळे कुटुंबीयांचा आर्थिक मदत व दिवस-रात्र प्रत्यक्ष प्रोजेक्टवर थांबून गरजवंतांची मदत अशा दोन्ही पद्धतीने सक्रिय सहभाग होता.
● कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेमध्ये सर्वत्र अज्ञान व गैरसमजाचे वातावरण पसरलेले होते. त्यामुळे नक्की काय करावे व काय करू नये हे कोणालाच काहीही समजत नव्हते. अशावेळी नागरिकांचे मनोबल उत्तम ठेवणे व त्यांना आपले आरोग्य आपले प्राचीन वैद्यक आयुर्वेदाच्या मदतीने कसे उत्तम ठेवावे यासंदर्भामध्ये डॉ.सौ. अंशु मुळे व डॉ. महेश मुळे यांनी आकाशवाणी, विविध रेडिओ व टीव्ही चॅनल्स, ऑनलाइन पद्धतीने ,अनेक ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन, ग्रामसभांच्या माध्यमातून नागरिकांचे सकारात्मक प्रबोधन केले. या प्रबोधनामुळे नागरिकांचे मनोबल निश्चितपणे उंचावले गेले. त्यांच्यातील गैरसमज दूर झाले व आयुर्वेदाच्या मदतीने नागरिकांचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहून अनेक नागरिक स्वतःला कोरोना होण्यापासून व ज्यांना कोरोना झाला आहे ते त्यावर मात करून यशस्वीपणे बरे झाले

इथे सुरु होते परिपूर्ण आरोग्याची...मातृत्वाची... वात्सल्याची कहाणी

Contact Detail

Reach out for authentic Ayurvedic treatments. Contact us to experience holistic wellness through ancient wisdom and personalized care.

YouTube Channel

Subscribe our channel to know more about panchakarma & ayurvedic treatments.

Panchakarma Treatments
0 +
Years’ Experience
0 +
Patients
0 +

Facilities

Panchakarma

Online Consultation

Counseling

Follow Us