loader image

Pimples and acne are common skin concerns among adolescent boys and girls, often triggered by hormonal changes during puberty. These breakouts can be more than just a cosmetic issue — they may reflect deeper imbalances in the body. If not treated properly and in time, acne can lead to long-term scarring, pigmentation, and reduced self-confidence. Modern lifestyles, irregular diets, and stress further aggravate these skin issues.

वयात येणाऱ्या मुला मुलींमध्ये दिसणारी ही मोठी समस्या आहे. काही वेळा स्त्रियांमध्ये पाळी जाण्याच्या काळामध्ये पण चेहऱ्यावर पिंपल्स येतात. या वयामध्ये मुलांना स्मार्ट दिसायचे असते आणि तेव्हाच येणारे हे पिंपल्स त्यांचा आत्मविश्वास कमी करतात. मग अशावेळी खूप जाहिराती त्यांच्या मदतीला येतात. जाहिरातीतली मलम लावून पिंपल्स जात नाहीत तर फक्त दाबले जातात हे हळूहळू त्यांच्या लक्षात येते . हळूहळू हे पिंपल्स छाती, दंड, पाठ यावरही वाढू लागतात.

चेहऱ्याची त्वचा ही शरीराच्या इतर त्वचे पेक्षा सात पट पातळ असते. आयुर्वेदानुसार मूल वयात येताना शरीरातील पित्तदोष वाढतो. त्याच वयामध्ये मुलांना चटपटीत, मसालेदार ,तळलेले कुरकुरीत पदार्थ खायला खूप आवडतात .मुलं रात्रीची जागरणं करतात. नियमित आहार घेण्याकडे दुर्लक्ष असते. स्वतःला सिद्ध करायचे असते त्यामुळे मानसिक ताण असतो. त्यामुळे पित्तासोबत वात आणि कफ हे दोषही वाढतात .रक्तामध्ये वाढलेले हे दोष चेहऱ्यावर पिंपलच्या स्वरूपात दिसू लागतात. पिंपल्स दाबणारी मलमे लावल्यामुळे त्वचेच्या ठिकाणी असणारे दोष निघून जात नाहीत तर तिथे येणारे नवीन फोन मोठ्या आकारामध्ये येतात. त्यामध्ये पू होतो, खूप वेदना होतात, कधी कधी त्याची गाठ बनते हे सर्व बरे होण्यासाठी, पिंपल्सचे पडलेले काळे डाग निघण्यासाठी खूप काळ लागतो. इथे पण लक्ष दिले नाही तर त्वचेवर खड्डे पडतात जे आयुष्यामध्ये कधीही भरून येत नाहीत. वेळीच लक्ष दिले तर इथपर्यंत त्वचा खराब होत नाही.

आयुर्वेदिक औषधे, रक्त मोक्षण, फेस पॅक, गरजेनुसार पंचकर्म केल्याने ही समस्या मुळापासून सुटते. त्वचेच्या इतर आजारांमध्ये जसे अतिशय कोरडी त्वचा , त्वचेवर काळे डाग असणे ,स्किन टॅनिंग होणे, अंगावर कुठेही फोड येणे,शीतपित्त urticaria, सोरायसिस, कोड vitiligo, Eczema, सर्वांगाची आग होणे, नागीण, हाता पायाला भेगा पडणे, सर्वांगाला खाज येणे. कोणतीही जखम लवकर न भरणे, tinia या सर्व आजारांमध्ये आयुर्वेदिक औषधे आवश्यक पंचकर्म रक्त मोक्षण केल्याने हे आजार मुळापासून बरे होतात.

  • चेहऱ्याला वारंवार हात लावू नका.
  • त्वचा ड्राय असेल तर मॉइश्चरायझर वापरा.
  • तेलकट त्वचा असेल तर योग्य फेस पॅक वापरा.
  • मेकअप प्रमाणामध्ये करा. चांगले मेकअप प्रॉडक्ट वापरा.
  • केसात कोंडा असेल तर तो आधी बरा करा.
  • अति सूर्यप्रकाशात जाताना चेहरा झाका, सनस्क्रीन वापरा.
  • तहान लागल्यावर पाणी प्या .
  • रोज एक तास व्यायाम करा.
  • वर सांगितलेले पदार्थ खाणे टाळा.
  • आहाराचे नियम पाळा. रोज सकाळी नाष्टा न करता त्याऐवजी अर्धा कप गाईचे दूध व 20 ml गाईचे तूप नियमितपणे सेवन करा.
  • रोज पाव वाटी ओल्या खोबऱ्याचे सेवन करा. खोबऱ्यामधील घटक पदार्थांमुळे रक्तातील पित्त दृष्टी कमी होते व त्यामधील असलेल्या विटामिन्समुळे त्वचेची गुणवत्ता सुधारते.
  • रोज पोट साफ होते ना याकडे लक्ष द्या.
  • व्यसनांमुळे सुद्धा पिंपल्स येतात त्यामुळे व्यसन करणे टाळा.
  • दिवसा झोपल्यामुळे शरीरातील त्रिदोषांचा प्रकोप होतो त्यामुळे पण पिंपल्स येतात.
  • खूप जोरात बोलणे हे एक पिंपल्सचे कारण आहे.
  • फ्रिज मधील पाणी शीतपेय अति आंबट अति तिखट पदार्थ टाळा.
  • भूक नसताना जेऊ नका.
  • भूक असताना जेवण करा.

आयुर्वेदानुसार दिनचर्या टाळली तर सर्व त्वचा विकारांपासून आपण मुक्त राहू शकतो.

Ayurvedic treatments offer a holistic approach to managing acne by addressing the root cause—internal imbalances of Pitta and Kapha doshas. With customized panchakarma therapies, dietary guidance, and lifestyle modifications, Ayurved helps cleanse the body and prevent recurring breakouts naturally. At Shree Kamala Ayurved Hospital, Ahilyanagar, Dr. Mahesh Mulay and Anshu Mulay specialize in Ayurvedic treatments for skin disorders, offering safe, long-term solutions for glowing, acne-free skin.

Book your consultation today.

Contact Detail

Reach out for authentic Ayurvedic treatments. Contact us to experience holistic wellness through ancient wisdom and personalized care.

YouTube Channel

Subscribe our channel to know more about panchakarma & ayurvedic treatments.

इथे सुरु होते परिपूर्ण आरोग्याची...मातृत्वाची... वात्सल्याची कहाणी

Panchakarma Treatments
0 +
Years’ Experience
0 +
Patients
0 +

Facilities

Panchakarma

Online Consultation

Counseling