loader image

Hair fall won’t stop with just oils and shampoos!
External care is important, but not enough.

Hair fall often starts from within — stress, poor digestion, hormonal imbalance, or toxin buildup.

That’s why Ayurvedic Panchakarma focuses on deep internal cleansing and balance.

✅ Treat the root cause

✅ Restore your body’s natural strength

✅ Regrow healthy hair – naturally!

केस गळणे ही समस्या लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांमध्ये दिसून येते. केस गळणे थांबवण्यासाठी केवळ डोक्यावर काही लावून पुरेसे होत नाही. कारण केस गळण्याचे कारण रक्तामध्ये असते. जोपर्यंत आपण रक्तात वाढलेले दोष काढून टाकत नाही तोपर्यंत केस गळणे पूर्णपणे थांबत नाही. बरेचदा असे पेशंट आम्हाला सांगतात जाहिराती पाहून कित्येक प्रकारची तेलं, शाम्पू ,कंडिशनर वापरले पण काही फायदा झाला नाही .मात्र अशा पेशंटला पोटातून औषधे दिली गरजेनुसार पंचकर्म , विद्धकर्म ,अग्नी कर्म, रक्तमोक्षण, प्रच्छान कर्म, शिरोभ्यंग, पोटातील औषधे दिली की केस गळणे पूर्णपणे थांबते. रक्तमोक्षनाने रक्तामध्ये असणारे दोष काढून टाकले जातात. विद्धकर्म व प्रच्छानकर्म यामुळे डोक्याच्या ठिकाणी रक्तावाटे आलेले दोष काढून टाकले जातात व तिथला रक्तपुरवठा वाढवला जातो जेणेकरून केसांचे पोषण सुधारते. केसांच्या मुळाशी कफाची दृष्टी असेल तर त्या ठिकाणी अग्निकर्म केले जाते. बस्ती ,विरेचन याद्वारे शरीरातील दोष काढून टाकले जातात. अशाप्रकारे शरीराची आणि रक्ताची शुद्धी केल्यावर येणाऱ्या नवीन केसांची जाडी वाढते, हे केस सुदृढ आहेत हे डोक्यात हात घातले की लगेच जाणवते. केसांचा कोरडेपणा जातो .त्यांना चमक येते. अकाली होणारे पांढरे केस पुन्हा काळे होतात.

केस गळण्याची वेगवेगळी कारणे आहेत .आत्ताची बदलती जीवनशैली ज्यामध्ये रात्री जागरण करायचे दिवसा झोपायचे. व्यायाम करायचा नाही किंवा अति व्यायाम करायचा.मसालेदार पदार्थ, साउथ इंडियन पदार्थ ,चायनीज पदार्थ, बेकरी उत्पादने, मल्टिपल प्रोसेस फुड, शिळे अन्न , पॅक फुड,भूक लागलेली असताना न जेवणे आणि भूक नसताना खाणे, पहिले अन्न पचायच्या आधीच पुढचे अन्न खाणे. पोट साफ न होणे .ऍसिडिटी, खूप चिडचिड करणे, अति शारीरिक कष्ट. मानसिक ताण. या कारणांमुळे शरीरातील वात ,पित्त आणि कफ तिन्ही दोषांचा प्रकोप होतो,प्रकोपित झालेले हे दोष रक्ता वाटे डोक्याकडे जातात. हे रक्त केसांच्या मुळाचे पोषण न करता ती मुळे ढिली करतात, कमजोर करतात कालांतराने केस गळू लागतात. केसांचे नीट पोषण न झाल्यामुळे नवीन येणाऱ्या केसांची जाडी कमी होते ते हातात घेतले तर सहज तुटू शकतात, केस कोरडे होतात.

खूप दिवसांपासून तुमच्या डोक्यात कोंडा असेल तर तो कदाचित Scalp Psoriasis या बरे होण्यासाठी अतिशय त्रासदायक आजाराचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. त्यामुळे दुर्लक्ष न करता तत्काळ डॉक्टरांना दाखवून खात्री करा. मानसिक ताण तणावाचा थेट परिणाम केस गळण्यावर होतो. सततच्या मानसिक ताणा मुळे पित्त प्रकोप होतो त्यामुळे रक्तदृष्टी होते त्यामुळे केस गळणे ,पांढरे होणे सुरू होते .ही समस्या बुद्धिजीवी वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात दिसते. स्त्री-पुरुषांमधील तंबाखू, मिश्री, सिगारेट, दारू, गुटखा इत्यादी व्यसनांमुळे रक्तदृष्टी होऊन केस गळणे , लवकर पांढरे होणे सुरू होते.

केस गळण्याची ही कारणे पण टाळणे अत्यंत गरजेचे आहे. जेवणामध्ये प्रोटीन्स जास्त प्रमाणामध्ये घ्यावेत. जे मांसाहारी लोक आहेत त्यांनी मटण, अंडी,चिकन घ्यावे .जे शाकाहारी लोक आहेत त्यांनी कडधान्य, सोयाबीन, मशरूम , पनीर यांचा आहारामध्ये वापर वाढवावा. पोट नियमित साफ होण्यासाठी व्यायाम करावा. सकाळी नाष्टा न करता त्याऐवजी अर्धा कप गाईचे दूध व 20 एम एल गाईचे तूप घ्यावे .तंतुमय पदार्थ म्हणजे पालेभाज्या ,मोड आलेली कड धान्य, फळभाज्या खाव्या म्हणजे मलाची निर्मिती चांगली होते.
आठवड्यातून किमान दोन दिवस केसांना रात्री झोपताना तेलाने मसाज करावा. दुसऱ्या दिवशी केस धुताना हार्ष शाम्पू वापरू नये, तो कसा ओळखावा- केस धुण्यासाठी शाम्पू वापरल्यानंतर जर केस प्रचंड कोरडे होत असतील, डोक्यात खाज येत असेल , केस तुटत असतील,तर समजावे तो शाम्पू आपल्या केसांना योग्य नाही.
आपली दिनचर्या व्यवस्थित करा .रात्री 10 ते 6 किंवा 11 ते 7 झोप घ्या. एक तास भरपूर व्यायाम करा. सकाळचे जेवण 11 ते 12 व रात्रीचे जेवण 7ते 8 च्या दरम्यान घ्या. केसांच्या समस्या दूर होतीलच पण इतरही आजारांपासून तुम्ही दूर राहता.

Book your consultation today to start your holistic hair revival journey.

Contact Detail

Reach out for authentic Ayurvedic treatments. Contact us to experience holistic wellness through ancient wisdom and personalized care.

YouTube Channel

Subscribe our channel to know more about panchakarma & ayurvedic treatments.

इथे सुरु होते परिपूर्ण आरोग्याची...मातृत्वाची... वात्सल्याची कहाणी

Panchakarma Treatments
0 +
Years’ Experience
0 +
Patients
0 +

Facilities

Panchakarma

Online Consultation

Counseling