जीर्ण व्याधींवर आयुर्वेदिक उपचार
आपण उत्तम आरोग्याची अपेक्षा करता का ?
सर्व जगात वेगाने प्रसिध्द होत असणाऱ्या व सर्व आजारांवर अतिशय परिणामकारक सिध्द होत असलेल्या आयुर्वेद शास्त्राला अभिप्रेत असलेल्या उत्तम आरोग्याविषयी आपण जाणून घेऊया. ज्या व्यक्तीस कोणतीही औषधे न घेता उत्तम भूक लागते, घेतलेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होवून ज्यास दुसऱ्या दिवशी सकाळी व्यवस्थित मल-मूत्र प्रवृत्ती होते,
ज्यास शांत झोप लागते, ज्याचे मन, आत्मा व सर्व इंद्रिये, आनंदी, समाधानी आहेत त्या व्यक्तीस स्वस्थ (Healthy) म्हणावे. ज्या व्यक्तीत वरीलपैकी कोणतीही एक गोष्ट वर सांगितल्याप्रमाणे नसेल त्यास अस्वस्थ किंवा आजारी म्हणावे.
जीर्ण व्याधी - जुने आजार (Chronic Disorders) म्हणजे काय ?
जे आजार व्यक्तीच्या शरीरात खूप दिवसांपासून ठाण मांडून असतात त्यास जीर्ण व्याधी म्हणावे. हे आजार एकएकटे कधी राहत नाहीत. सोबत ते इतर आजारांना घेवून राहतात किंवा आजार वाढवत जातात व आपल्या शरीरातील इतर अवयवांमधे अनेक दोष निर्माण करतात. उदा आम्लपित्ताचा (Hyperacidity) त्रास असणाऱ्या व्यक्तीचे केस अधिक गळतात, लवकर पांढरे होतात. त्यांना विविध त्वचा विकार होऊ शकतात. लवकर चष्मा लागतो चष्म्याचा नंबर वाढू शकतो. हृदयविकार होऊ शकतो, व्हेरीकोज व्हेन्सचा त्रास होऊ शकतो, अल्सरचा त्रास होतो. संडासला आग होते, कधीकधी रक्त पडते त्यामुळे रूग्णास ‘आपल्याला मुळव्याधीचा त्रास आहे’ असे वाटू लागते परंतु मूळ आजार मात्र आम्लपित्त असतो. हे लक्षात न आल्याने रूग्ण गोंधळात पडतो व प्रत्येक वेगळया लक्षणासाठी त्याच्या वेगवेगळ्या डॉक्टरांकडे फेऱ्या सुरू होतात. परंतु मूळ आजारच बरा होत नसल्याने त्याला इतर लक्षणांसाठी अपेक्षित गुण येत नाही. त्यामुळे मग नैराश्य (Depression) यायला सुरूवात होते. स्वभावातील चीडचीड वाढते, अभ्यासात -व्यवसायात मन रमत नाही. आपल्या मागेच अशी अनेक आजारांची ‘ब्याद’ का लागली याचे उत्तर योग्य मार्गदर्शना अभावी रूग्णास सापडत नाही. यातूनच अनेक मनोशारिरीक विकार (Psychosomatic Disorders ) निर्माण होतात. ज्या कुटुंबात वरील प्रमाणे रूग्ण असेल त्या घरातील सर्वच व्यक्तींचे आरोग्य बिघडल्या सारखे होते. त्याला फरक पडावा म्हणून विविध प्रकारच्या तपासण्यांच्या चक्रात त्या रूग्णासोबत त्याचे संपूर्ण कुटुंब या डॉक्टरांकडून त्या डॉक्टरांकडे अशा फेऱ्या मारत रहाते. परंतु मूळ आजारच दुर्लक्षित राहील्याने रूग्णाचे आर्थिक, शारिरीक व मानसिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत रहाते. म्हणूनच कोणत्याही जुन्या आजारांबाबत / लक्षणांबाबत तात्पुरत्या स्वरूपात पडणाऱ्या फरकावर समाधान न मानता तो आजार आपल्या शरीरातून कायम स्वरूपी निघून गेला पाहीजे या उद्देशानेच प्रत्येक व्यक्तीने प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहीजेत. तरच प्रत्येकजण खऱ्या अर्थाने शरिरीक व मानसिक पातळीवर परिपूर्ण आरोग्यदायी जीवन जगू शकेल.
आपल्या शरीरातील सर्व संस्थांमध्ये ( Systems) खालील जीर्ण व्याधी – जुने आजार आढळून येतात. या सर्व आजारांवर १९९८ पासून आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण इ. पंचकर्मांनी व विशेष संशोधित आयुर्वेदीक औषधांनी यशस्वी उपचार करीत आहोत. ‘आयुर्वेदीक औषधांनी उशीरा गुण येतो’ हा गैरसमज समाजात रूढ होता. वास्तविक योग्य निदान व उच्च दर्जाची उत्तम औषधे यामुळे रूग्णास दहा दिवसात लक्षणांमध्ये समाधानकारक बदल जाणवू लागतात.
शरीरात आढळणारे विविध जीर्णव्याधी- जुने आजार
डोक्याचे व मेंदूचे विकार:
मनाची चंचलता, वर्तणुकसमस्या, विस्मरण, Depression, निरूत्साह, अतिनिद्रा, निद्रानाश, डोकेदुखी, कर्णबाधिर्य, सतत कान दुखणे, कानात सतत आवाज येणे, अर्धशिशी (Migrain), चक्कर येणे, फिट्स येणे, स्मरणशक्ती कमी होणे Less Concentration memory, Loss of memory recall डोक्यात कोंडा, केसगळणे, अकाली केस पांढरे होणे, डोळ्यांनी कमी दिसणे, चष्म्याचा नंबर सतत बदलणे, डोळे लाल होणे आग होणे, लहान वयात चष्मा लागणे, अकारण नैराश्य, आत्मविश्वास नसणे, अलिप्त राहणे.
पचनासंबंधीचे आजार:
भूक न लागणे, अति भूक लागणे, बध्दकोष्ठ (पोट साफ न होणे), वारंवार मळमळ होणे, पोटात व छातीत आग होणे, अतिशय ढेकर येणे, गॅसेस होणे, पोटात पाणी होणे, अति तहान, अजीर्ण, जुलाब, ग्रहणी, प्रवाहिका, उलटी, पोट दुखणे, अम्लपित्त, आतडयात व्रण (Ulcer) होणे, कृमी (जंत), वारंवार तोंड येणे, मुळव्याध, मधुमेह (Diabetes) व त्याचे किडनी, डोळे व लैंगिक क्षमतेवर होणारे दुष्परीणाम सर्व प्रकारचे ताप, काविळ, पांढरी काविळ (Hepatitis – B), पांथरी, वजन जास्त असणे (Obesity), वजन अतिशय कमी असणे.
मूत्रमार्गाचे आजार:
लघवी लाल किंवा खूप कमी प्रमाणात होणे शरीरसंबंधाच्या वेळी लघवीच्या ठिकाणी आग होणे, तेथे जखम अथवा फोड येणे. लघवी अडून राहणे, लघवीला आग होणे, ऑपरेशन न करता औषधांनी मुतखडा (Kidney Stone ) व पित्ताशयातील खडे (Gall Stone) काढून टाकणे व पुन्हा पुन्हा हे खडे न होण्यासाठी सलग औषधी उपचार. लघवीचा Control नसणे, वारंवार लघवी होणे, तेथे खाज येणे, Prostate ग्रंथी वाढणे, लहान मुलांना अंथरूणात लघवी होणे.
त्वचेचे विकार:
त्वचा सुरकुतणे, खरूज, नायटा, नागिण, त्वचा पांढरी पडणे, Anaemia रक्ताचे प्रमाण नेहमी कमी होणे. एखाद्या विशिष्ट अवयवाची किंवा सर्वांगाची आग होणे, पिंपल्स, त्वचा काळी पडणे, त्वचेवर लाल/काळे डाग पडणे, अंगावर फोड येणे, त्वचेवर गाठी येणे, हातापायाला भेगा, अंगाला खाज येणे, हत्तीपाय (Fileriasis), पांढरे कोड, Vitiligo, सोरीयासीस (Psoriasis), Eczema, अत्यंत कोरडी त्वचा.
हाडासंबंधी विकार:
उंची कमी असणे, हाडांची, मणक्याची झीज होणे, मणक्यातील चकती सरकल्यामुळे कंबरदुखी, मानदुखी, हातापायांना मुंग्या येणे, हातापायातील ताकद कमी होणे, लहान मुलांमधे माती खाणे, वयाप्रमाणे मूल न चालणे – न बसणे – न बोलणे, हाडांची झिज झाल्यामुळे कंबरेचा खुबा बदलावा लागणे, गुडघा बदलावा लागणे यावर यशस्वी पंचकर्म व औषधी उपचार.
वातव्याधी:
सर्व प्रकारचे संधी वात (Arthritis), पॅरालिसीस, सायटिका, टाच दुखणे, मणके विकार (Spondylitis- Spondylosis)
छातीचे विकार:
कशाची तरी अॅलर्जी असणे, वारंवार सर्दी होणे, दम लागणे, शिंका येणे, खोकला येणे, दमा, टी. बी. हृदयरोग, ब्लड प्रेशर, Cholesterol वाढणे.
स्त्रियांमधील जुने आजार
विशेषतः स्त्रियांमधील जुने आजार नेहमी व अधिक दिवस अधिक प्रमाणात अंगावरून पांढरे जाणे, मासिक पाळीत जास्त व अधिक दिवस रक्तस्त्राव होणे या त्रासदायक अशा दोन्ही तक्रारींकरीता आयुर्वेदीक औषधांनी उत्तम फरक पडतो व गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया टाळता येते व गर्भाशय काढून टाकल्यामुळे शरीरावर होणारे दुष्परिणामही टाळता येतात. स्तनांचा आकार अपेक्षेपेक्षा खूप लहान किंवा मोठा असणे, बाळंतपणानंतर / सिझर झाल्यावर वजन खूप वाढणे (वात सुटणे) बाळांतपणा नंतर मुळव्याध होणे, स्तनपानासाठी दुध अजिबात न येणे किंवा कमी प्रमाणात येणे,
बाळंतपणानंतर (१ वर्षानंतर) लैंगिक संबंधाची इच्छा कमी होत जाणे, योनीच्या ठिकाणी नेहमी खाज येणे, आग होणे. शरीर संबंधाच्यावेळी ओटीपोट दुखणे, अकाली शरीरसंबंधाची इच्छा खूप कमी होणे
(Libido) यामुळे लैंगिक समाधान न मिळाल्याने कौटुंबिक कलह निर्माण होऊन अनेक मानसिक आजार मागे लागणे. वारंवार लघवीला जावे लागणे व त्यातूनच पुढे लघवीवर नियंत्रण न रहाणे.
मधुमेह, हृदयविकार, उच्चरक्तदाब (High B.P.), मानसिक विकार हे सर्व शरीरात अनेक समस्या निर्माण करणारे जीर्णव्याधीच आहेत
इथे सुरु होते परिपूर्ण आरोग्याची...मातृत्वाची... वात्सल्याची कहाणी
Contact Detail
Reach out for authentic Ayurvedic treatments. Contact us to experience holistic wellness through ancient wisdom and personalized care.
- Shree Kamala Ayurved Hospital, Lendkar Mala, Balikashram Road, Ahmednagar 414003.
- +91 9309039395
- [email protected]