पांचभौतिक चिकित्सा
आयुर्वेदिक उपचार पद्धतींपैकीच पांच भौतिक चिकित्सा ही देखील एक वेगळ्या वाटेने विचार करणारी आयुर्वेदिक औषधी उपचार पद्धती आहे. बृहतत्रयीरत्न वैद्यराज आप्पाशास्त्री दातार यांनी ही चिकित्सा पद्धत शोधून काढली व त्यांनी या चिकित्सा पद्धतीचा लाखो रुग्णांवर यशस्वी वापर केला व ही चिकित्सा किती प्रभावी आहे हे सर्वांना उदाहरणांसहित दाखवून दिले.
पिंडी ते ब्रम्हांडी या न्यायाने आपले शरीर व निसर्ग दोन्हीही पंचमहाभूतांपासूनच बनलेले आहेत. या पंचमहाभूतांच्या गुणधर्मांचा उपयोग करून त्यानुसार पांचभौतिक शरीरातील अनेक आजारांवर या पद्धतीने उपचार केले जातात. 💐प्रत्येक ऋतूनुसार निसर्गातील पंचमहाभूतांचे गुणधर्म ज्याप्रमाणे बदलतात त्याप्रमाणेच बदल आपल्या शरीरावर देखील होत असतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आप्पांनी या चिकित्सेचे वेगळेपण जपले आहे. पांचभौतिक चिकित्सेचे वैशिष्ट्य म्हणजे ही चिकित्सा अत्यंत सद्य फलदायी immediately result oriented आहे.
या चिकित्सेतील औषधांची मात्रा doses खूपच कमी असते. त्याचबरोबर ही औषधे पेशंटला घ्यायला देखील खूप सोपी व चवीला देखील छान असतात. त्यामुळे आजकालच्या धकाधकीच्या जीवनात रुग्णांना ही औषधे ऑफिसमध्ये, बसमध्ये चालता बोलता घेणे सहज शक्य होते.
क्षार व आम्लधर्म सिद्धांत, जन्मतारखेनुसार क्षार, आम्ल, उभयधर्मी, ऋतुसंधीकालीन अशा पद्धतीची प्रकृती, क्षार व आम्ल औषधे, यकृत Liver प्लिहा Spleen व उभयवृक्क Both Kidneys यांच्या माध्यमातून केली जाणारी अग्निसंस्था परीक्षा. या तीनही अवयवांवरील विशिष्ट पद्धतीचे नाद परीक्षण ही सर्व पांच भौतिक चिकित्सेची उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत.
एक दिवसाच्या बाळापासून ते शंभर वर्षाच्या वृद्धापर्यंत सर्व वयोगटात ही औषधे अतिशय सुरक्षितपणे वापरता येतात. या चिकित्सा पद्धतीची औषधी बनवण्याची प्रक्रिया देखील खूप शास्त्रशुद्ध व वेगळ्या पद्धतीची आहे.
Change language to read this information in other languages
इथे सुरु होते परिपूर्ण आरोग्याची...मातृत्वाची... वात्सल्याची कहाणी
Contact Detail
Reach out for authentic Ayurvedic treatments. Contact us to experience holistic wellness through ancient wisdom and personalized care.
- Shree Kamala Ayurved Hospital, Lendkar Mala, Balikashram Road, Ahmednagar 414003.
- +91 9309039395
- [email protected]