loader image

वंध्यत्वावर आयुर्वेदिक उपचार

श्री कमला आयुर्वेद हॉस्पिटल, अहमदनगरचे डॉ. महेश मुळे आणि डॉ. अंशु मुळे वंध्यत्वावर आयुर्वेदिक उपचार देतात.

सध्याच्या काळात प्रकर्षाने भेडसावणाऱ्या व वेगाने वाढत असलेल्या समस्यांपैकी मूल न होणे ही समस्या मोठया प्रमाणात दिसून येत आहे. आहारातील बदल, दिनचर्येतील बदल, शारीरिक नैसर्गिक प्रक्रियांना मनुष्यातर्फे केला जाणारा विरोध, अनेक मानसिक विकार, चुकीची लाईफस्टाईल, नेहमी असणारी चिंता, ताण तणाव, दारू – तंबाखू – गुटका या व्यसनांचे प्रजनन संस्थेवर होणारे गंभीर दुष्परिणाम यामुळे वंध्यत्वाचे प्रमाण तीव्रतेने वाढत आहे. हा एक गंभीर – चिंतेचा विषय होत आहे. हा विषय सामाजिक प्रतिष्ठेचा व भावनिक गुंतवणुकीचा असल्याने काही लोक गरज नसतांना या समस्ये विषयी गोपनियता (गुप्तता) बाळगतात, त्यामुळे या रूग्णांवर वेळीच उपचार करणे कठीण जाते.

वंध्यत्व म्हणजे काय?

वंध्यत्व या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे. या शब्दाचा अगदी सरळ अर्थ म्हणजे विवाहानंतर एक वर्षभर कोणतेही गर्भनिरोधक साधन न वापरता, व्यवस्थित शरीरसंबंध येऊनही गर्भधारणा न होणे. यामध्ये स्त्री व पुरूषामधील दोषांमुळे मूल न होणे असे अभिप्रेत आहे. याचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत.

  1. Primary Infertility स्त्री अथवा पुरुषामधील दोषांमुळे विवाहानंतर एकदाही दिवस न राहणे.
  2. Secondary Infertility पहिले मूल झाल्यानंतर अपघातामुळे, आजारामुळे किंवा इतर काही कारणांमुळे स्त्री-पुरूषात दोष निर्माण होऊन पुन्हा दिवस न राहणे.

मूल न होण्यामागे स्त्री किंवा पुरुष अथवा दोघांमध्ये आढळणारे दोष कारणीभूत ठरतात. सध्याच्या वस्तुस्थितीनुसार हे प्रमाण दोन्ही लिंगांमध्ये जवळ जवळ ५०% आढळून आले आहे. त्यामुळेच औषधोपचार चालू करण्यापूर्वी दोघांचीही एकत्र पूर्ण तपासणी करणे अत्यावश्यक आहे.

खालील स्त्री-पुरूषांमधील आढळणाऱ्या वंध्यत्वाच्या सर्व कारणांवर १९९८ पासून आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये वमन, विरेचन, बस्ती, स्त्री-पुरूष उत्तरबस्ती, नस्य, रक्तमोक्षण इ. पंचकर्मांनी व विशेष संशोधित अभ्यंतर औषधी उपायांनी यशस्वी उपचार करीत आहोत.

स्त्रियांमधील वंध्यत्वाची कारणे

गर्भाशय व अंडाशय (Ovary) अतिशय लहान असणे. जागेवरून सरकलेले असणे, या दोन्हींवर सूज असणे, लग्नाच्या आधीपासूनच किंवा लग्नानंतर पाळी खूप अनियमीत असणे, पाळीत अंगावरून अतिशय कमी प्रमाणात जाणे, गाठी जाणे, त्या काळात पोट व कंबर अतिशय दुखणे, छाती दुखणे. वारंवार अंगावरून पांढरे जाणे / लाल जाणे, गर्भाशयात जखम असणे, गाठी (Uterine Fibroid) असणे. हार्मोन्स (Harmones) चे प्रमाण कमी अधिक असणे, वारंवार गर्भपात होणे, गर्भात अनेक दोष निर्माण होणे. (Congenital Anamoly) दिवस राहिलेले नसतानाही स्तनांतून चिकट स्त्राव येणे.

At Shri Kamala Ayurved Hospital, Ahmednagar, Dr. Mahesh Mulay & Dr. Anshu Mulay provides holistic ayurvedic treatment for female infertility issues with Panchakarma

बीजदोष (Genetic Disorders)

स्त्री अथवा पुरूष बीजामध्ये असलेल्या सूक्ष्म दोषांमुळे विकृत गर्भ निर्माण होणे. (Congenital Anamoly) वारंवार गर्भपात (Habitual abortion) होणे, मृत गर्भ निर्माण होणे.

Torch Test Positive असणे:

पतीची किंवा पत्नीची अथवा दोघांची टॉर्च टेस्ट पॉझिटीव्ह असल्याने दिवस न राहणे अथवा वारंवार गर्भपात होणे. या रूग्णांच्या बाबतीत पंचकर्मांनी दोघांच्या शरीराची सूक्ष्म स्तरावर शुध्दी करून स्त्रियांमध्ये उत्तरबस्ती व नंतर पोटातून सलग तीन महिने औषधे देऊन गर्भधारणेस परवानगी दिली जाते व खात्रीलायक उपचार केले जातात.

PCOD / PCOS -

अंडाशयांवर (ovaries) सूज व Harmones (अंतस्त्रावांच्या)असमतोलामुळे लग्नानंतर किवां लग्नाच्या आधीपासूनच पाळी खूप अनियमित असणे, स्त्रीबीज तयार न होणे, ते वेळेवर न फुटणे, वजन खूप वाढणे, ओठांवर हनुवटीवर दाढीसारखे केस येणे. स्त्रियांमधे आढळणाऱ्या वंध्यत्वाच्या कारणांपैकी हे एक अतिशय गंभीर कारण आहे. येथे पंचकर्म व औषधी उपायांनी निश्चित फरक पडून उत्तम संतती होते. Thyroid ग्रंथी विकारः ग्रंथीचे स्त्राव अधिक किंवा कमी असल्याने वजन वाढणे, कमी होणे, अंगावर सगळीकडे सूज येणे, मानसिक आजार, गर्भधारणा न होणे, गर्भपात होणे.

Tubal Block :

Fallopian Tube बीजवाहक नलिका बंद असणे : प्रजनन संस्थेमध्ये खूप दिवस राहिलेल्या जंतुसंसर्गामुळे (Infection – Chronic PID) क्षयरोग(TB) झाल्यामूळे किंवा पूर्वी बऱ्या झालेल्या टीबीच्या प्रजनन संस्थेवरील गंभीर दुष्परिणामांमूळे एक किंवा दोन्ही बीजवाहक नलिका अंशत: किंवा पूर्णत: बंद असणे, हे स्त्रियांमधील वंध्यत्वाचे एक गंभीर कारण आहे. आमचे येथे यावर टयुबोप्लास्टी सारखी कोणतीही शस्त्रक्रिया न करता पंचकर्मातील योग बस्ती व्दारे व उत्तर बस्ती या थेट गर्भाशयात खोलवर जावून केल्या जाणाऱ्या उपचारांव्दारे यशस्वी उपचार केले जातात.

Endometrial Insufficiency गर्भाशयाचा अंतःस्तर अतिशय पातळ असणे:

वारंवार केल्या जाणाऱ्या क्युरेटीनमुळे, गर्भपातांमुळे, टीबीमुळे गर्भाशयाचा गर्भधारणेच्या व गर्भाचे पोषण होण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा Endometrium नावाचा अंतस्तर खरवडला जातो, पातळ होत जातो. गर्भ न राहाण्यास हे एक गंभीर कारण ठरते. बस्ती व उत्तरबस्तीचा येथे परिणामकारक उपयोग होतो.

Unexplained Infertility:

दृष्य स्वरूपात पती पत्नीचे सर्व रिपोर्टस् नॉर्मल असतांना, समोर स्थूलमानाने कोणत्याही स्वरूपात दोष दिसत नसतांनाही अनेक वर्षे गर्भधारणा न होणे. या ठिकाणी पंचकर्माव्दारे पती पत्नीच्या शरीराची सुक्ष्म स्वरूपात शुध्दी करून नंतर सलग दिलेल्या अभ्यंतर औषधांनी यशस्वी उपचार करतो.

टेस्टटयुब बेबी (IVF):

उपचार करूनही ज्या जोडप्यांना आतापर्यंत मूल झालेले नाही त्यांनी आयुर्वेदीक औषधी व पंचकर्म उपचारांचा तज्ञ व्यक्तिंच्या मार्गदर्शनाखाली निश्चित लाभ करून घ्यावा.

पुरूषांमधील वंध्यत्वाची कारणे

शुक्रजंतुंची संख्या कमी असणे, अथवा अजिबात नसणे, त्यांची हालचाल कमी असणे, शीघ्रवीर्यपतन, स्वप्नदोष, लिंगात कडकपणा न येणे, लघवीतून धातू जाणे, हस्तमैथुन, हायड्रोसील, व्हेरीकोसील, शुक्रजंतुचा आकार – रचना प्राकृत नसणे, वृषण व लिंगाचा आकार खूप लहान असणे, अम्लधर्मी शुक्र.

हस्तमैथुन (Masturbation):

वयात आल्यापासून दीर्घकाळपर्यंत सतत हस्तमैथुन केल्याने वृषण व लिंगाची वाढ खुंटते. शीर्घवीर्यपतन, लिंगात कडकपणा न येणे, शुक्रजंतुंची निर्मीती कमी होणे – विकृत होणे, लैंगिक संबंधाची भितीवाटणे यासारख्या गंभीर समस्या निर्माण होतात. नैराश्य येऊन अनेक मानसिक विकार निर्माण होतात.

मधुमेह Diabetes मुळे लैंगिक समस्या :

शरीरसंबंधाची स्त्री-पुरुषांना इच्छा न होणे, लैंगिक समाधान न मिळणे, लिंगात ताठरता न येणे, शीघ्रवीर्यपतन, शुक्राणूंची संख्या कमी असणे किंवा अजिबात नसणे, सतत थकवा येणे, उत्साह न वाटणे या सर्वांमुळे गर्भधारणा न होणे.

High Blood Pressure (Hypertension), हृदयविकार व मानसिक विकार :

यामुळे नेहमी थकवा, Depression येणे, चिंता वाटणे, भिती वाटणे, संबंधात तणाव वाटणे, शरीर संबंधाची इच्छा कमी होणे, लैंगिक समाधान न मिळणे, वारंवार गर्भपात होणे, गर्भधारणा न होणे यावर विशेष संशोधित पध्दतीने पंचकर्म व औषधी उपचार केले जातात.

उत्कृष्ट अपत्या (संतती) साठी विशेष प्रयत्न “शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी

सध्याचा काळ हा गुणवत्तेला (Quality ) महत्व देणारा आहे. त्यामुळे आपले मूल हे सर्वार्थाने सर्वगुण संपन्न असले पाहिजे. ही प्रत्येक आईवडिलांची प्रामाणिक इच्छा असते. कारण ज्या स्त्री आणि पुरूष बीजांच्या संयोगातून गर्भ निर्माण होतो, त्या बीजांमध्येच सूक्ष्म स्वरूपातील दोष असतील तर ते दोष जसेच्या तसे बाळात येतात. हल्ली मुलांची प्रतिकारशक्ती कमी असणे हे ही बऱ्याच वेळा दिसून येते. त्यामुळे मुले वारंवार आजारी पडतात. वाढते प्रदुषण, मोठ्या प्रमाणात रासायनिक खते वापरून तयार होणारी नसलेली अन्न धान्ये यामुळे दिवसेंदिवस आपली प्रतिकारशक्ती कमी होते आहे. 

मात्र आता येणारी नविन पिढीतील बालके हा आघात सहन करू शकत नाहीत म्हणून गर्भावस्थेत किंवा त्याही पूर्वी त्यांना आपल्याकडून उत्तमोत्तम देण्याचा प्रयत्न पालकांनी केला तर अशाही परिस्थितीत सक्षम अशी बालके आपण जन्मास घालू शकतो.

इथे सुरु होते परिपूर्ण आरोग्याची...मातृत्वाची... वात्सल्याची कहाणी

Contact Detail

Reach out for authentic Ayurvedic treatments. Contact us to experience holistic wellness through ancient wisdom and personalized care.

YouTube Channel

Subscribe our channel to know more about panchakarma & ayurvedic treatments.

Panchakarma Treatments
0 +
Years’ Experience
0 +
Patients
0 +

Facilities

Panchakarma

Online Consultation

Counseling